महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ (म.प.वि.मं)

(महाराष्ट्र शासन)

मुखपृष्ठ

मायरा  

बीआयपी 

प्रजनन स्वास्थ्य तपासणी

रा.कृ.वि.यो.

इतर   

संपर्क

 

 

 


महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ (म.प .वि .मं) बाबत

महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाची स्थापना महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक सीडीएस-१०/२००१(पीके-५९) एडीएफ-४ मुंबई-३२ दि. २.४.२००२

मुख्यालय अकोला, शिबीर कार्यालय: पुणे व नागपूर

महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाची स्थापना केंद्ग शासनाच्या मार्गदर्शक सुचना प्रमाणे व महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक सीडीएस-१०/२००१(पीके-५९) एडीएफ-४ मुंबई-३२ दि. २.४.२००२ अन्वये करण्यांत आली. महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय सर्व प्रथम पुणे येथे मुख्यालयी स्थापन करण्यांत आले. महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक सीडीएम-१०/२००१ (पीके-५९)पदुम-४ मंत्रालय, मुंबई-३२ दिनांक ७.६.२००३ अन्वये महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्य कार्यालय (मुख्यालय) हे अकोला येथे दिनांक १२.९.२००३ रोजी स्थलांतरीत करण्यांत आले.सुरवातीला केंद्र सरकारने रु.१७.२० कोटी रक्कम मंजूर केली पैकी रु. ८.६० कोटी पहिला हप्ता म्हणून सन २००५-०६ मध्ये प्रकल्प (एन.पी. सी. बी बी अंतर्गत) राबवण्यासाठी पत्र. क्र ३-२२/२००३ -ए.एच.टी.(एन.पी. सी. बी बी) भारत सरकार,कृषी मंत्रालय, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय,कृषी भवन, नवी दिल्ली,दिनांक २६-९-२००३ ) प्रदान करण्यात आले.

•अधिक वाचा

 

 
     पशुवैद्यकांची प्रतिज्ञा


MLDB

 

पशुवैद्यकीय शास्त्र उपचारपध्दतीच्या व्यवसायामध्ये व्यावसाईक या नात्याने प्रविष्ट झाल्यामुळे , मी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, मी माझे शास्त्रीय ज्ञान व कौशल्य यांचा उपयोग पशुधनाच्या स्वास्थाचे रक्षण करणे, आजारी पशुधनास होणा-या यातनांतून वाचविणे, पशुधनाचे जतन करणे तसेच सार्वजनिक आरोग्य वृध्दिंगत करण्याच्या माध्यमातून सदैव समाजाच्या हितासाठीच करेन आणि पशुवैद्यकीय शास्त्रामधे वेळोवेळी होणा-या प्रगतीनुसार माझे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी निरंतर कार्यरत राहीन.मी माझा पशुवैद्यकीय व्यवसाय अत्यंत सजगपणे तसेच आत्मसन्मानाने कृतीमध्ये आणीन आणि यामध्ये पशुवैद्यकीय व्यवसायातील नीतीमुल्यांची पूर्णपणे जपणूक करीन. माझे व्यावसायिक ज्ञान व तांत्रिक कार्यक्षमतेमध्ये सातत्याने सुधारणा करण्याची माझी जबाबदारी असून ती मी माझ्या पूर्ण आयुष्यभरासाठी स्विकृत करीत आहे.



Total Visitors:
Free Counter
 
X
Su Mo Tu We Thu Fr Sa